-
‘पारू'(Paaru) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात.
-
दिशा किर्लोस्करांना उद्ध्वस्त करण्यासाठी सातत्याने कट कारस्थान करताना दिसते.
-
दिशा जेव्हा जेव्हा किर्लोस्कर कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तेव्हा पारू तिच्यासमोर उभी राहते. त्यामुळे दिशाचे प्लॅन यशस्वी होत नाहीत.
-
पारू ही किर्लोस्करांच्या घरात काम करते. मात्र, त्या कुटूंबाला ती सर्वस्व मानते. आदित्यवर तिचे प्रेम आहे.
-
मालिकेतील पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणेने साकारली आहे.
-
अभिनेत्री या भूमिकेतून घराघरांत पोहोचली आहे.
-
आता शरयू सोनावणेने गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये ती पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे.या लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने लिहिले, “मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!” (सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे इंस्टाग्राम )

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…