-
‘कोकण हार्टेड गर्ल’ फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) व संगीतकार कुणाल भगतने (Kunal Bhagat) काल (३० मार्च) रोजी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा (Gudi Padwa Celebration) साजरा केला.
-
गुढीपाडव्यानिमित्त अंकिता व कुणालने ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले होते.
-
अंकिताने हिरव्या व केशरी रंगाची मोर खण पैठणी साडी (Peacock Khaan Paithani Saree) नेसली होती.
-
कुणालने खणाचा केशरी रंगाचा कुर्ता (Orange Khaan Kurta) आणि हिरव्या रंगाचे जॅकेट (Green Khaan Jacket) परिधान केले होते.
-
अंकिता व कुणालचा हा लूक फॅशन डिझायनर केतकी शाहने (Ketaki Shah) डिझाईन केला होता.
-
अंकिताने नेसलेल्या साडीवरील मोराची नक्षी तयार करण्यासाठी लागणारी कुशल हातमाग प्रक्रिया सुमारे ५ ते ६ दिवसांची आहे.
-
मोर खण पैठणी साडीतील लूकवर अंकिताने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले होते.
-
केतकी शाह म्हणाल्या… ‘मोराची नक्षी बुट्टी ही पैठणी साड्यांवरील सर्वात प्रतिष्ठित आणि पारंपरिक डिझाइन्सपैकी एक आहे. ती सौंदर्य, लालित्य आणि कृपेचं प्रतीक मानली जाते आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करते.’
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)
बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा