-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि ३० नोव्हेंबर २०२४ला बंद झाली.
-
‘आई कुठे काय करते’ मालिका ऑफ एअर होऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. तरीही मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात.
-
तसंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील बरेच कलाकार आता नवनवीन भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
-
लवकरच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील दोन कलाकार सूरज चव्हाणच्या बहुचर्चित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात झळकणार आहेत.
-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
-
‘झापुक झुपूक’ चित्रपटात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी आणि जुनी संजना म्हणजे अभिनेत्री दीपाली पानसरे झळकणार आहे.
-
‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं नुकतंच नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
-
सूरज चव्हाणच्या या बहुचर्चित चित्रपटात मिलिंद गवळी, दीपाली पानसरे व्यतिरिक्त इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, पुष्कराज चिरपुटकर पाहायला मिळणार आहेत.
रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”