-
अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यापैकी एक जोडी आहे.
-
अभिजीत आणि सुखदा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
-
सुखदाचा आज वाढदिवस असून तिच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने खास फोटो शेअर केले आहेत.
-
खास फोटोसह त्याने एका हिंदी गाण्याद्वारे तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मैं अगर कहूँ तुमसा हसीन, कायनात में नहीं हैं कहीं”
-
तसंच यापुढे शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “तुझ्याबद्दल सगळं काही लिहिता येण अशक्य आहे. साथीदार, सखी, जोडीदार, टीकाकार. तू सगळंच आहेस.”
-
अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदाबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांचा प्रेमविवाह आहे.
(फोटो सौजन्य – अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम) -
एका फेसबुक मॅसेजमुळे त्यांच्या दोघांत मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि काही दिवसांच्या मैत्रीनंतर अभिजीतने सुखदाला लग्नासाठी विचारले.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा