-
आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
-
मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. सध्या अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केलेले बालपणीचे फोटो सर्वत्र चर्चेत आले आहेत.
-
‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती.
-
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना या लोकप्रिय अभिनेत्रीने काही जुने फोटो शेअर केले. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री शिवानी रांगोळे आहे.
-
गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
‘बन मस्का’, ‘सांग तू आहेस का?’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘आम्ही दोघी’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये शिवानीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
-
वैयक्तिक आयुष्यात शिवानीने अभिनेता विराजस कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली आहे.
-
तर, शिवानीच्या सासूबाई मृणाल कुलकर्णींना सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
-
या सासू-सुनेचं बॉण्डिंग सोशल मीडियावर कायम चर्चेत असतं. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम )
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड