-
मराठी मालिकाविश्वात काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
-
इन्स्टाग्रामवर ‘We’re married!’ असं कॅप्शन देत या अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
-
‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री रूही तारू नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या मालिकेत तिने पार्वती मातेची भूमिका साकारली होती. या मालिकेने छोट्या पडद्यावर जवळपास ४ वर्षे अधिराज्य गाजवलं.
-
रूहीचा लग्नसोहळा पुण्यात थाटात पार पडला. तिच्या पतीचं नाव मंदार कामठे असं आहे.
-
रूहीचा पती मंदार हा व्यवसायाने इंजिनिअर आहे. असं त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केलेलं आहे.
-
याशिवाय रूहीने ‘मोरूची मावशी’ या नाटकात सुद्धा काम केलेलं आहे. या नाटकात तिने निशा हे पात्र साकारलं होतं.
-
आता वैयक्तिक आयुष्यात रूही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. संपूर्ण कलाविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षांव करण्यात येत आहे.
-
अभिनेत्रीने लग्नात बेबी पिंक रंगाचा सुंदर लेहेंगा घातला होता. तिच्या लग्नातील सुंदर फोटो सध्या सर्वत्र चर्चेत आले आहेत.
-
रूही आणि मंदार या दोन नावांना जोडून अभिनेत्रीने लग्नाच्या फोटोंवर ‘माही’ ( मंदार + रूही ) हा हॅशटॅग वापरला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रूही तारू व uday_lasurkar इन्स्टाग्राम )

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड