-
स्टार प्रवाहच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. (Divya Pugaonkar)
-
या मालिकेत दिव्याने ‘आनंदी’ ही भूमिका साकारली होती आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी दिव्या सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर दिव्या तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
अशातच दिव्याने लाल रंगाच्या साडीतील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र असलेल्या लूकमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत आहे.
-
लाल साडीतील मनमोहक सौंदर्यासह दिव्याचे दिलखुलास हास्यही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
दरम्यान, दिव्या सध्या झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या मालिकेतील दिव्याच्या जान्हवी या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
(फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड