-
मराठीसह हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
-
आजवर आपल्या नानाविध भूमिकांनी तिने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
-
सोनाली सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंकडे चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.
-
सोनालीने लाल रंगाच्या प्रिंटेड आणि डिझाइनर ड्रेसमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
-
कमीत कमी मेकअप असलेल्या या साध्या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
-
दरम्यान, सोनाली तिच्या आगामी ‘सुशिला सुजित’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात सोनालीबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी पाहायला मिळणार आहे.
(फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण