-
‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली.
-
या अभिनेत्रीचं नाव आहे अमृता देशमुख. आजवर विविध नाटक व मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे.
-
अमृताची काही दिवसांपूर्वीच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एन्ट्री झाली. यामध्ये ती सई हे पात्र साकारत आहे.
-
‘पारू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा आदित्य म्हणजेच प्रसाद जवादेची अमृता देशमुख पत्नी आहे.
-
नोव्हेंबर २०२३ मध्ये अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांनी लग्नगाठ बांधली होती.
-
‘बिग बॉस मराठी’मुळे अमृता-प्रसादची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती.
-
अमृताची ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एन्ट्री झाल्यावर प्रसादने तिचं पोस्ट शेअर करत कौतुक केलं होतं.
-
तर, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकरांनी अमृताची एन्ट्री झाल्यावर ‘वेलकम सूनबाई’ म्हणत तिचं या मालिकेत स्वागत केलं होतं.
-
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते. तर, प्रसादची प्रमुख भूमिका असलेली ‘पारू’ मालिका संध्याकाळी ७:३० वाजता प्रक्षेपित केली जाते. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख, प्रसाद जवादे आणि झी मराठी वाहिनी )
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”