-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून लोकप्रिय झालेली विनोदी अभिनेत्री म्हणजे चेतना भट.
-
स्किटमध्ये विविधांगी पात्र साकारत प्रेक्षकांना हसवणारी चेतना सोशल मीडियावरही सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर चेतना अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
अशातच सोशल मीडियावर चेतना भटने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
-
चेतनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या गाडीच्या वर्षपुर्तीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
यात तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या आयुष्यात पंचला खूप महत्त्व आहे. स्किटमध्ये विनोदी पंच आणि प्रवासात टाटा पंच”.
-
तिने पुढे म्हटलं आहे की, “गेल्या वर्षभरात माझे सगळे हसरे रुसरे क्षण आणि अनेक उतार-चढाव अनुभवलेत अशी माझी टाटा पंच”.
-
चेतनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
(फोटो सौजन्य : चेतना भट इन्स्टाग्राम) -
दरम्यान, चेतनाने आजवर काही मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय नुकतीच ती ‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटात पाहायला मिळाली

पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणर मानसन्मान अन् अचानक धनलाभ