-
दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती आज या जगात नाही, पण ती तिच्या चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत आहे. दिव्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच हादरवून सोडले होते.
-
मोठ्या नायिकांना स्पर्धा दिली
ती या जगात नाही हे मानायला आजही तिचे चाहते तयार नाहीत. दिव्याने तिच्या छोट्याशा इनिंगमध्ये इंडस्ट्रीतील अनेक बड्या नायिकांना टक्कर दिली होती. दिव्या अवघ्या काही दिवसात सुपरस्टार बनली होती. -
एक खास ओळख निर्माण केली
दिव्याने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा श्रीदेवी, जुही चावला, माधुरी दीक्षित यांसारख्या अभिनेत्री अगोदरच नावाजलेल्या होत्या, पण अवघ्या काही दिवसांतच दिव्याने स्वतःची खास ओळख निर्माण करून चाहत्यांच्या मनावर राज्य केले. -
अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले
दिव्याने बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. दिव्याने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. -
विश्वात्माने बॉलिवूडमध्ये एन्ट्री
बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी दिव्याने तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही हिट चित्रपट केले होते. १९९२ मध्ये रिलीज झालेल्या सनी देओलच्या विश्वात्मा चित्रपटातून दिव्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. -
चित्रपट हिट झाले
यानंतर दिव्याने दिवाना, दिल आशना है, दिल ही तो है, दिल का क्या कसूर आणि शोला और शबनममध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. दिव्याचे जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले. -
हा विक्रम केला
१९९२ मध्ये दिव्या भारतीने धमाकेदार चित्रपट केले. यावर्षी बॉक्स ऑफिसवर दिव्या भारतीचे एकूण १२ चित्रपट प्रदर्शित झाले. -
हा विक्रम कोणीही मोडू शकले नाही
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजपर्यंत एकही अभिनेत्री एका वर्षात १२ चित्रपट प्रदर्शित करण्याचा दिव्यांचा विक्रम मोडू शकली नाही. मग ती ऐश्वर्या राय असो वा माधुरी दीक्षित. -
मृत्यूनंतर हे चित्रपट अपूर्ण राहिले
दिव्या भारतीच्या निधनामुळे तिचे जवळपास ९ चित्रपट अपूर्ण राहिले आहेत. यात आंदोलन, धनवान, अंगरक्षक, दिलवाले, हसल, विजय पथ, मोहरा, लाडला, कर्तव्य या चित्रपटांचा समावेश आहे. -
१९९३ मध्ये दिव्याचा मृत्यू झाला
दिव्या भारतीच्या निधनाला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९३ मध्ये, दिव्याचा तिच्याच फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता. -
(All Photos: Social Media) हेही पाहा- सत्या ते सरकार; दिग्दर्शक राम गोपाल वर्माला ‘या’ ७ चित्रपटांनी दिलं घवघवीत यश, आजही हे सिनेमे चर्चेत असतात…

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल