-
मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे तिने जोडलेली रेशीमगाठ अजूनही कायम आहे.
-
प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
अभिनयासह तिने व्यवसाय या क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. तसंच तिने निर्मितीत क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत राहत असते.
-
सोशल मीडियावर प्राजक्ता तिचे अनेक सुंदर सुंदर फोटो शेअर करत असते.
-
अशातच प्राजक्ताने नुकतेच राखाडी रंगाच्या साडीमधील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
राखाडी साडीवर प्राजक्ताने लाल रंगाच्या ब्लाऊज परिधान केला आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
राखाडी साडी, लाल ब्लाऊज आणि गळ्यात हार अशा खास लूकमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य खुलून आलं आहे.
-
दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीही अल्पावधीतच लाईक्स व कमेंट्सद्वारे पसंती दर्शवली आहे.
(फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

Tanisha Bhise Death Case : “होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”