-
‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील आयटम साँगमधून भाव खाऊन गेलीली श्रीलीला सध्या खूप चर्चेत आहे. याचं कारण आहे ‘आशिकी ३.’
-
अनुराग बासू दिग्दर्शित ‘आशिकी ३’ चित्रपटात श्रीलीला कार्तिक आर्यनसह झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हीच श्रीलीला लग्नाच्या आधी वयाच्या २४व्या वर्षी दोन मुलांची आई आहे. तसंच ती कोट्यवधीची मालकीन आहे.
-
१४ जून २००१मध्ये जन्मलेल्या श्रीलीलाने तेलुगू आणि कन्नड सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रीलीलाने एमबीबीएस शिक्षण घेतलं आहे.
-
२०२१मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्याआधी तिने ‘किस’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती भरतनाट्यम नृत्यांगना आहे.
-
श्रीलीला ही बंगळुरूच्या स्त्रीरोगतज्ज्ञ स्वर्णलताची मुलगी आहे. तिचा जन्म आई-वडील विभक्त झाल्यानंतर झाला होता. जेव्हा श्रीलीलाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, तेव्हा तिला सुरपनेनी सुभाकर यांची मुलगी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.
-
त्यानंतर २०२१मध्ये सुरपनेनी सुभाकर राव यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, श्रीलीला माझी मुलगी नाहीये. पूर्वाश्रमीची पत्नी स्वर्णलतापासून विभक्त झाल्यानंतर श्रीलीलाचा जन्म झाला. त्यामुळे माझ्याशी नाव जोडणं बंद करा, अशी विनंती केली.
-
२०२२मध्ये श्रीलीलाने अनाथ आश्रमातून दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं. गुरू आणि शोभिता असं त्यांचं नाव आहे. या दोघांना एक चांगलं जीवन देण्याचा श्रीलीलाने निर्णय घेतला. माहितीनुसार, श्रीलीलाने ‘बाय टू लव्ह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हे पाऊल उचललं.
-
एका अहवालानुसार, श्रीलीलाची एकूण संपत्ती सुमारे १५ कोटी रुपये आहे.
-
करिअरच्या सुरुवातीला, ती चित्रपटांसाठी प्रति तास ४ लाख मानधन घेत होती. नंतर तिचं मानधन वाढून १.५ कोटी रुपये झालं. पुढे ३ कोटी रुपयांपर्यंत गेलं. आता श्रीलीला ४ कोटी मानधन घेत आहे. ( सर्व फोटो सौजन्य – श्रीलीला इन्स्टाग्राम )
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’