-
‘झी मराठी’च्या लोकप्रिय नायिकेने नुकताच तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला. तिचं नाव आहे प्राप्ती रेडकर.
-
प्राप्ती रेडकरला बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. आजवर तिने ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
-
मात्र, ‘कलर्स मराठी’च्या ‘काव्यांजली’ आणि सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेमुळे प्राप्तीला घराघरांत एक नवीन ओळख मिळाली.
-
‘झी मराठी’ची ही लोकप्रिय नायिका केवळ २१ वर्षांची आहे.
-
अभिनेत्रीने नुकताच तिचा २१ वा वाढदिवस कुटुंबीयांसह साजरा केला. याचे सुंदर फोटो प्राप्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
प्राप्तीने या फोटोंना “21 Already?” असं कॅप्शन देत आपल्या वयाचा खुलासा केला आहे. तसेच या पोस्टला अभिनेत्रीने “२१ बर्थडे, ग्रेटफूल” असे हॅशटॅग सुद्धा दिले आहेत.
-
प्राप्ती अभिनयासह अजून एका क्षेत्रात आपली आवडत जोपासत आहे. तिला कराटे आणि किक बॉक्सिंगची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीने या खेळात सुवर्णपदक देखील जिंकलं आहे. याशिवाय प्राप्ती उत्तम डान्स सुद्धा करते.
-
प्राप्तीचं सेटवर ऑफस्क्रीन सर्वांशी एकदम सुंदर नातं असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
अल्पावधीतच या गोंडस अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर इन्स्टाग्राम )
कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO