-
मराठी सिनेविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने मुंबईत तिचं ‘ड्रीम होम’ खरेदी केलं.
-
अमृता खानविलकरचं हे नवीन घर २२ व्या मजल्यावर असून, तिने या फ्लॅटला ‘एकम’ असं नाव दिलं आहे.
-
अभिनेत्रीने तिचं हे नवीन घर अतिशय सुंदररित्या सजवलं आहे.
-
अमृताने तिच्या नव्या घराची झलक प्रेक्षकांबरोबर युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे.
-
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला या घराचा ताबा मिळाला होता. यानंतर संपूर्ण इंटिरियर केल्यावर, आपलं हक्काचं घर मनासारखं सजवल्यावर अभिनेत्रीने यावर्षी जानेवारी महिन्यात या नवीन घरात गृहप्रवेश केला.
-
नव्या घरातील प्रशस्त हॉल, बेडरुम, वॉकिंग वॉर्डरोब या सगळ्याची झलक अमृताने प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.
-
अमृताच्या या नव्या घरातून खूपच सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो.
-
याशिवाय अभिनेत्रीच्या नव्या घराच्या नेमप्लेटने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेमप्लेटवर ‘अमृता खानविलकर’ या नावाखाली ‘एकम’ असं तिच्या घराचं नाव देखील लिहिण्यात आलं आहे.
-
अमृताचं हे नवीन घर चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. सर्वांनी अभिनेत्रीचं या नव्या घरासाठी भरभरून कौतुक केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर युट्यूब चॅनेलच्या व्हिडीओतून स्क्रिनशॉट )
वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी