-
लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) लिखित आणि दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ (Ashi Hi Jamva Jamvi) हा चित्रपट आज (१० एप्रिल) प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) व वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
‘प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.
-
या चित्रपटात चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
या चित्रपटाच्या प्रीमियरला लोकेश यांची बायको चैत्राली गुप्ते (Chaitrali Gupte) व शुभवी गुप्ते (Shubhavi Gupte) उपस्थित होते.
-
शुभवी गुप्ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ (AshokMaMa) या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत शुभवी ‘संयमी’ ही भूमिका साकारत आहे.
-
शुभवीच्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
शुभवी इन्स्टाग्रामवर (Instagram) सक्रिय असून बरेच फोटो आणि रील व्हिडीओ शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शुभवी गुप्ते/इन्स्टाग्राम)
कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO