-
रश्मिका मंदानाने ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हिंदी चित्रपटसृष्टीतही या अभिनेत्रीला खूप प्रेम मिळत आहे.
-
ती ‘अॅनिमल’ आणि ‘छावा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली. त्याचबरोबर सलमान खानसोबत ‘सिकंदर’ चित्रपटातही झळकली आहे. या चित्रपटासाठी तिने ५ कोटी रुपये इतके मानधन घेतले.
-
तमन्ना भाटियाचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ होता. हा सिनेमा २००५ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली.
-
अभिनेत्री स्त्री २ मध्येही दिसली होती आणि तिचे ‘आज की रात’ हे गाणे खूप चर्चेत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये घेते.
-
समांथा रूथ प्रभू कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नसली तरी तिने २ हिंदी वेब सिरीजमध्ये काम केले आहे. हिंदीतील तिची पहिली सिरीज द फॅमिली मॅन २ होती.
-
त्यानंतर ती ‘सिटाडेल हनी बनी’मध्ये दिसली. समांथाने सिटाडेलसाठी सुमारे ४ कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
पूजा हेगडेचा पहिला बॉलिवूड चित्रपट मोहेंजोदारो होता ज्यामध्ये ती हृतिक रोशनसोबत दिसली होती. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता पण तो फ्लॉप झाला. यानंतर ती हाऊसफुल ४, सर्कस, किसी का भाई किसी की जानमध्ये दिसली. शाहिदसोबत ‘देवा’ मध्येही दिसली होती. यासाठी तिने ३.५ ते ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
काजल अग्रवालने २००४ मध्ये ‘क्यूं! हो गया न…’ या बॉलिवूड चित्रपटातून तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती साऊथकडे वळली आणि अनेक हिट चित्रपट दिले. ती सिंघममध्येही दिसली होती.
-
अलिकडेच ती सिकंदरमध्येही दिसली. यासाठी तिने सुमारे ३ कोटी रुपये शुल्क आकारले आहे. हेही पाहा- Photos : “हुस्न है सारी अदाओं में, इश्क़ है…”; तपकिरी गाऊनमध्ये मनमोहक रुचिरा जाधव

खासदार सुप्रिया सुळे यांच्या सासू ॲनी सुळे यांचं निधन