-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) नुकतीच समृद्ध वारसास्थान असलेले मुंबईतील (Mumbai) भायखळा (Byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan & Zoo) गेली होती.
-
या प्राणीसंग्रहालयातील काही फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या प्राणी संग्रहालयात सध्या शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरण, अजगर, तरस आणि पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस आदी प्रकराचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत.
-
श्रेया म्हणाली… “आजपर्यंत राणीबाग म्हटलं की लहान मुलांसाठी एक पिकनिकच ठिकाण एवढंच चित्र डोक्यात यायचं. माझ्या ही डोक्यात असंच होतं. पण नुकत्याच काही दिवसांपूर्वी मी ‘मुंबई झू’ (The Mumbai Zoo) म्हणजे राणीबागेला भेट दिली. मी खरंच खूप अचंबित होते अशा अनेक गोष्टी पहायला मिळाल्या.”
-
“आपण नेहमी म्हणतो परदेशात असणाऱ्या गोष्टींसारख्या गोष्टी आपल्या इथे भारतात सुद्धा असायला हव्या. तशाच आणि त्याहून अधिक चांगल्या दर्जाच्या गोष्टी मला राणीबागेत पाहायला मिळाल्या…मुंबई म्हणजे सारखी धावपळ आणि ट्रॅफिक. पण या ठिकाणी गेल्यावर समजतं हे एक वेगळं जग आहे… वेगवेगळे पक्षी, प्राणी, सुंदर असा निसर्ग हे सगळं एक वेगळा अनुभव देऊन जातं…”
-
“मुंबईचे नागरिक म्हणून तर आपण या उपक्रमाला आवर्जून भेट दिलीचं पाहिजे…आणि फक्त मुंबईकर नव्हे तर सर्व देशातील व राज्यातील पर्यटकांनी एकदा तरी इथे भेट द्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत नक्की जा खुप धमाल आणि मजा करायला मिळेल…”
-
भायखळा येथील राणीच्या बागेचा झपाट्याने होणारा कायापालट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
मुंबईतील राणीची बाग साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल