-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाड गेल्यावर्षी आई झाली. गायिकेने १४ मे २०२४ रोजी पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांनी दिली होती.
-
कार्तिकीच्या लेकाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते.
-
अखेर लेकासाठी एक खास गाणं प्रदर्शित करून कार्तिकीने त्याचा चेहरा रिव्हिल केला आहे.
-
कार्तिकीने तिच्या लाडक्या लेकासाठी खास ‘अंगाई-नीज बाळा’ हे गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्याची गीतकार, संगीतकार आणि गायिका कार्तिकी गायकवाड स्वत: आहे.
-
या गाण्यात कार्तिकी, तिचा पती रोनित पिसे आणि तिच्या चिमुकल्या लेकाची झलक पाहायला मिळत आहे.
-
कार्तिकीने तिच्या लाडक्या लेकाचं नाव रिशांक असं ठेवलं आहे.
-
रिशांक या नावाचा अर्थ भगवान शिव यांचा भक्त असा होतो.
-
‘रिशांक कार्तिकी रोनित पिसे’ असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या लेकाचं नाव आणि त्याची पहिली झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
कार्तिकीच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड युट्यूब व्हिडीओतून स्क्रीनशॉट )
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल