-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. १४ एप्रिल रोजी दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. आलिया भट्ट ही चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्रींपैकी एक आहे. (छायाचित्र: प्राइम व्हिडिओ)
-
आलिया भट्टने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत २४ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी फक्त काही चित्रपट फ्लॉप झाले असून १९ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. तिचे ब्लॉकबस्टर चित्रपट कोणते आणि आपण ते कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतो याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (छायाचित्र: प्राइम व्हिडिओ)
-
स्टुडंट ऑफ दी इयर
आलिया भट्टने २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते, या चित्रपटाचे बजेट ५९ कोटी रुपये होते आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९७ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (छायाचित्र: प्राइम व्हिडिओ) -
हायवे
२०१४ मध्ये आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा अभिनीत ‘हायवे’ चित्रपट बनवण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च आला होता आणि या चित्रपटाने ४७ कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर देखील उपलब्ध आहे. (छायाचित्र: प्राइम व्हिडिओ) -
२ स्टेट्स
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर स्टारर ‘२ स्टेट्स’ या चित्रपटाचे बजेट ४५ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने १७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. १०० कोटी क्लबमध्ये सामील होणारा हा आलिया भट्टचा पहिलाच चित्रपट होता. तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. (छायाचित्र: जिओ हॉटस्टार) -
हम्प्टी शर्मा की दुल्हनिया
२०१४ मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याचे बजेट ३३ कोटी रुपये होते आणि त्याने ११९ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (छायाचित्र: प्राइम व्हिडिओ) -
कपूर अँड सन्स
२८ कोटी रुपये खर्चून बनवलेला आलिया भट्ट स्टारर ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटाने थिएटरमध्ये १४८ कोटी रुपये कमावले होते. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
उडता पंजाब
२०१६ मध्ये आलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटाचे बजेट ३४ कोटी रुपये होते आणि कलेक्शन ९६ कोटी रुपये होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर देखील उपलब्ध आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
डियर जिंदगी
२०१६ मध्ये ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात आलिया भट्टने पहिल्यांदाच किंग खान म्हणजेच शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर केली होती. २२ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३८ कोटी रुपये कमावले. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर देखील पाहू शकता. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
बद्रीनाथ की दुल्हनिया
‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्ये आलिया भट्टसोबत वरुण धवनही होता. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाचे बजेट ३९ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर त्याने सुमारे २०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तुम्ही ते OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
राजी
२०१८ मध्ये आलेल्या ‘राजी’ चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. ३५-४० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (छायाचित्र: प्राइम व्हिडिओ) -
गली बॉय
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर गली बॉय हा चित्रपट ६० ते ७० कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २३८ कोटी रुपये कमावले होते. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर देखील पाहू शकता. (छायाचित्र: प्राइम व्हिडिओ) -
गंगूबाई काठियावाडी
गंगूबाई काठियावाडीमधील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे बजेट १०० कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने २०९ कोटी रुपये कमावले होा. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
आरआरआर
२०२२ मध्ये आलेल्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला. चित्रपटाचे बजेट ५५० कोटी कोटी होते आणि त्याचे कलेक्शन १,२५३ ते १,३८७ कोटी रुपयांच्या दरम्यान होते. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (छायाचित्र: नेटफ्लिक्स) -
रॉकी और रानी की प्रेम कहानी
१६० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने थिएटरमध्ये ३५५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (फोटो: प्राइम व्हिडिओ)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल