-
मराठी मालिकाविश्वातील दोन सख्ख्या भावांची जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे.
-
हे दोन्ही भाऊ सध्या टेलिव्हिजन विश्वातील दोन आघाडींच्या वाहिन्यांवर महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
-
या दोघांमध्ये एकजण ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. तर, दुसरा भाऊ ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे.
-
मराठी कलाविश्वातील या दोन सख्ख्या भावांची नाव आहेत मंदार जाधव व मेघन जाधव.
-
मंदार जाधव गेली अनेक वर्षे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. आता मंदार एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
मंदारची प्रमुख भूमिका असलेली ‘कोण होतीस तू, काय झाली तू’ ही मालिका २८ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
तर, मेघन सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे.
-
जयंत या मालिकेत जान्हवीशी नेहमीच विकृतपणे वागताना दिसतो. जयंत या पात्रामुळे मेघन सध्या घराघरांत चर्चेत आला आहे.
-
मेघन आणि मंदार या दोघांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मंदार जाधव व मेघन जाधव इन्स्टाग्राम )
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’