-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या (Sharmishtha Raut) लेकीचं काल (२० एप्रिल) बारसं होते.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णीने (Shivani Rangole Kulkarni) शर्मिष्ठाच्या लेकीच्या बारश्यातील (Name Ceremony) खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
‘काही लोक इतके खास असतात की त्यांचा आनंद आपलाच वाटतो आणि तो असाच सतत वाढत जावा असं मनापासून वाटतं. शर्मिष्ठा ताई आणि तेजस दादा…’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोंना दिले आहे.
-
शर्मिष्ठाने लेकीचं ‘रुंजी’ (Runji) असे गोड नाव ठेवले आहे.
-
‘रुंजी’ नावाचा अर्थ अकस्मात सुंदर आणि मनात रुंजी घालणं म्हणजे मनात सतत घोळत राहणं.
-
लेकीच्या बारश्यासाठी शर्मिष्ठाने पांढऱ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली नऊवारी साडी (White Red Border Nauvari Saree) नेसली होती.
-
ऑक्टोबर २०२०मध्ये शर्मिष्ठाने तेजस देसाईबरोबर (Tejas Desai) लग्नगाठ बांधली होती.
-
लग्नाच्या साडे चार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा (Parents) झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे आणि शर्मिष्ठा राऊत/इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack: ‘दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली’, हल्ल्यात मारला गेलेला सय्यद हुसैन शाह कोण आहे?