-
श्रेयस तळपदे एक बहुपरिचित मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता आहे.
-
श्रेयसने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००५ मध्ये ‘इक्बाल’ या चित्रपटाद्वारे करून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
-
त्याचबरोबर ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ मालिका, ‘हाऊसफुल २’ व ‘पोस्टर बॉईज’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये श्रेयसने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
-
श्रेयसने अलीकडेच ‘पुष्पा :द राईज’ आणि ‘पुष्पा २ :द रूल’ या चित्रपटांच्या हिंदी डबिंगसाठी अल्लू अर्जुनच्या आवाजाची नक्कल केली आहे.
-
सोशल मीडियावर अभिनेता चर्चेत असतो.
-
सोशल मीडियावरील हे फोटो श्रेयसने झी मराठी वाहिनीवरील ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाच्या सेटवरून काढले आहेत.
-
या लूकसाठी श्रेयसने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाचे जॅकेट व पॅन्ट परिधान केली आहे.
-
या आउटफिटवर अभिनेत्याने निळ्या रंगाचा गॉगल वापरला आहेत.
-
या गॉगलमुळे श्रेयसच्या लूकला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.
-
त्याचबरोबर या आउटफिटवर श्रेयसने एका हातात घड्याळ, तर दुसऱ्या हातात सोन्याचे कडे परिधान केले आहे.
-
श्रेयसचा हा देखणा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेयस तळपदे / इंस्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…