-
२० एप्रिल रोजी हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट आणि डायलन मेयर यांनी लॉस एंजेलिसमधील कॅसिटा डेल कॅम्पो रेस्टॉरंटमध्ये आयोजित एका खास समारंभात लग्न केले. या जोडप्याने पहिल्यांदा नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/@kristennstewartu)
-
अभिनेत्री क्रिस्टनने तिच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल गुप्तता राखली होती, या नात्याबद्दल मात्र ती अभिमानाने उघडपणे व्यक्त झाली होती. अखेर तिने व्यवसायाने पटकथा लेखक असणाऱ्या डायलन मेयरबरोबर लग्नचा निर्णय घेतला (फोटो स्रोत: Instagram/@kristennstewartu)
-
पीपल मॅगझिननुसार, स्टीवर्ट आणि मेयर यांची भेट २०१३ च्या एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती, त्यानंतर सहा वर्षांनी ते एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पुन्हा एकत्र आल्या. ऑगस्ट २०१९ मध्ये, न्यू यॉर्क शहरातील एका रस्त्यावर पापाराझींनी स्टीवर्टला मेयरचे चुंबन घेतानाचा फोटो टिपला होता. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/@kristennstewartu)
-
आजकालच्या मिलेनियल्सप्रमाणे या जोडप्याने देखील त्यांचे नाते उघड करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला, ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतानाचा फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केला आणि त्यांचे नात्यावर शिक्कामोर्तब केले. (फोटो स्रोत: Instagram/@spillzdylz)
-
एका महिन्यानंतर स्टीवर्टने द हॉवर्ड स्टर्न शोमध्ये त्यांच्या साखरपुड्याबाबत भाष्य केले होते, यामुळे हे जोडपे लवकरच लग्न बंधनात अडकणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (फोटो स्रोत: Instagram/@kristennstewartu)
-
७ मार्च २०२२ रोजी ‘द हॉलिवूड रिपोर्टर’ने आयोजित केलेल्या ऑस्कर पार्टीत हे जोडपे एकत्र सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी एखाद्या कार्यक्रमात सार्वजनिकरित्या एकत्र हजेरी लावण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. काही दिवसांनी, १३ मार्च रोजी २०२२ च्या क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये त्यांनी रेड कार्पेटवर पदार्पण देखील केले. (फोटो स्रोत: Instagram/@kristennstewartu)
-
रविवारी स्टीवर्ट आणि मेयर विवाहबंधनात अडकल्या, तेव्हा लग्नाच्या फोटोंमध्ये स्टीवर्टने फिकट राखाडी रंगाचा मिनी स्कर्ट आणि क्रॉप केलेल्या पांढऱ्या टी-शर्टवर कार्डिगन घातलेला, तर मेयरने केसांमध्ये काळी रिबन बांधली होती आणि क्रीम सिल्क मिनी ड्रेस घातला होता. ( फोटो स्रोत: Instagram/@kristennstewartu)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…