-
जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) शहरापासून सहा किलोमीटरवरील बैसरन (Baisaran) या गवताळ पठारावर अतिरेक्यांनी हा नियोजित हल्ला केला.
-
मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असताना किमान पाच अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.
-
बैसरन पठारावर केवळ पायी किंवा खेचरांवरूनच तेथे जाता येते.
-
या हल्ल्यात किमान २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
-
अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) इन्स्टाग्रामवर काश्मीरमधील काही जून फोटो शेअर केले आहेत.
-
अदिती गेल्या वर्षी २२ एप्रिल २०२४ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे फिरायला गेली होती.
-
अदिती म्हणाली, ‘कल्पना करा! त्या शिकाऱ्यामधून मी परत येऊ शकले नसते तर! पांढऱ्या शुभ्र बर्फावर आता रक्त आहे. २२.०४.२०२४ गेल्या वर्षी याच दिवशी मी पहलगाममध्ये होते. या फोटोंचे आणि त्या आठवणींचे आता काहीच उरले नाही. माझे मनं किंचाळतेय, तडफडतेय, रडतेय अपरंपार वेदनेने आणि रागाने भरून गेले आहे. आणि हे सगळं कशासाठी? फक्त मी हिंदू आहे म्हणून! ते सगळे होते हिंदू!’
-
निसर्ग सौंदर्यामुळे पहलगामला भारतातील स्वित्झर्लंड (Switzerland) असे समजले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड/इन्स्टाग्राम)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”