-
बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’चे लाखो-करोडो चाहते आहेत. माधुरी दीक्षित तिच्या अभिनय व तसेच नृत्यांसाठी ओळखली जाते. ‘हम आपके हैं कौन’, ‘मोहब्बत’, ‘कोयला’, ‘वजूद’ अशा अनेक चित्रपटांतील अभिनेत्रीच्या भूमिका गाजल्या आहेत. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
२०१३ मध्ये रणबीर कपूरने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने माधुरी दीक्षितबाबत वक्तव्य केले होते. (फोटो सौजन्य: रणबीर कपूर इन्स्टाग्राम)
-
रणबीर कपूर म्हणाला होता की, मी माधुरीजींचा मोठा चाहता होतो. मला आठवतं, जेव्हा त्यांचे लग्न झाले, तेव्हा मी रडलो होतो. (फोटो सौजन्य: रणबीर कपूर इन्स्टाग्राम)
-
पुढे रणबीर कपूर असेही म्हणाला होता की, जर मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तर आनंद होईल. रणबीर कपूर व माधुरी दीक्षित यांनी ‘ये जवानी हैं दिवानी’ या चित्रपटात ‘घागरा’ या गाण्यात एकत्र काम केले आहे. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
रणबीर कपूर बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. बऱ्याचदा तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याची पत्नी आलिया भट्ट हीदेखील नावाजलेली अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य: रणबीर कपूर इन्स्टाग्राम)
-
आता आलिया आणि रणबीर कपूर लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत विकी कौशलदेखील दिसणार आहे. (फोटो सौजन्य:रणबीर कपूर इन्स्टाग्राम)
-
संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये हे कलाकार कोणत्या भूमिकांत दिसणार आणि काय कमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य: रणबीर कपूर इन्स्टाग्राम)
-
माधुरी दीक्षित नुकतीच ‘भूल भुलैय्या ३’ मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
चित्रपटांबरोबरच अभिनेत्री डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदीही दिसते.आता ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
Pahalgam Terrorist Attack : “माझ्या नवऱ्यावर दहशतवाद्यांनी पहिली गोळी झाडली, सरकारने…”, शुभम द्विवेदीच्या पत्नीची मागणी काय?