-
अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांना टीव्हीवरील ‘शक्तिमान’ या मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवून दिली. (फोटो सौजन्य: मुकेश खन्ना इन्स्टाग्राम)
-
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी संपूर्ण देश माझ्या पाया पडतो; मात्र आता हा शिष्टाचार इंडस्ट्रीमधून नाहीसा होत असल्याचे वक्तव्य केले. (फोटो सौजन्य: कपिल शर्मा इन्स्टाग्राम)
-
तसेच कपिल शर्मामध्ये शिष्टाचार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुकेश खन्ना कपिल शर्माबाबत नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊ. (फोटो सौजन्य: कपिल शर्मा इन्स्टाग्राम)
-
मुकेश खन्ना यांनी नुकतीच ‘अनसेन्सॉर विथ शार्दुल’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत कपिल शर्माबद्दल मुकेश खन्ना म्हणाले, “मला कपिल शर्मा का आवडत नाही आणि का मी त्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला. याचे एक कारण आहे. (फोटो सौजन्य: मुकेश खन्ना इन्स्टाग्राम)
-
“ती गोष्ट सर्वांचे डोळे उघडणारी आहे. गोल्ड पुरस्कार सोहळ्यात मला एक पुरस्कार देण्यात आला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात कपिल शर्मादेखील उपस्थित होता.” (फोटो सौजन्य: कपिल शर्मा इन्स्टाग्राम)
-
“तो त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन आला होता. त्यालादेखील पुरस्कार देण्यात आला होता.” (फोटो सौजन्य: कपिल शर्मा इन्स्टाग्राम)
-
“त्यावेळी तो कॉमेडी सर्कस हा शो करायचा. तो आला आणि माझ्या शेजारी बसला.” (फोटो सौजन्य: मुकेश खन्ना इन्स्टाग्राम)
-
“त्याने मला ओळखही दिली नाही. तो जवळजवळ २० मिनिटे तिथे बसला होता. पुरस्कारासाठी जेव्हा त्याचे नाव घेण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेऊन गेला.” (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
-
“जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीला कधीही भेटला नसाल तरी तुम्ही त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याशी बोलता, हे संस्कार आहेत. इंडस्ट्रीमधील ही बंधुता आहे; पण कपिल शर्मामध्ये जरासुद्धा शिष्टाचार नाही”, असे परखड वक्तव्य मुकेश खन्ना यांनी केले. (फोटो सौजन्य: कपिल शर्मा इन्स्टाग्राम)
ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल