-
रेणुका शहाणे यांनी नुकतेच एका मुलाखतीत शाहरूख खानबाबत केलेले वक्तव्य मोठ्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्य: रेणुका शहाणे इन्स्टाग्राम)
-
रेणुका शहाणे यांनी नुकतीच रेडिओ नशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी शाहरुख खानची पहिली नायिका म्हणून काम कऱण्याचा अनुभव कसा होता, याबाबत वक्तव्य केले. (फोटो सौजन्य: शाहरुख खान इन्स्टाग्राम)
-
रेणुका शहाणे आणि शाहरुख खान यांनी ‘सर्कस’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे. या मालिकेत रेणुका शहाणे या शहारुख खानच्या नायिका होत्या. (फोटो सौजन्य: रेणुका शहाणे इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री म्हणाल्या, “त्याने आधीच ‘फौजी’ ही मालिका केली होती, त्याचा मोठा चाहता वर्ग तयार झाला होता.” (फोटो सौजन्य: शाहरुख खान इन्स्टाग्राम)
-
“त्याचे शूटिंग बघण्यासाठी हजारो लोक गर्दी करत असत. मी त्याला ३६-३६ तास काम करताना पाहिलं आहे. तो त्याच्या कामाप्रति समर्पित आहे.” (फोटो सौजन्य: शाहरुख खान इन्स्टाग्राम)
-
“याबरोबरच तो सर्वांशी नम्रतेने वागत असे. स्पॉटबॉयपासून ते निर्मात्यापर्यंत तो सर्वांना समान वागणूक देत असे, सर्वांशी आदराने वागत असे. तो महिलांबरोबर ज्या पद्धतीने वागतो, त्यावरून कळते की तो जेंटलमन आहे.” (फोटो सौजन्य: शाहरुख खान इन्स्टाग्राम)
-
“लोकांबरोबर स्वत:ला जोडण्यासाठी तो मेहनत घेतो. इतरांच्या कामाचे कौतुक करतो”, असे म्हणत रेणुका शहाणे यांनी शाहरूख खानबरोबर त्याची पहिली नायिका म्हणून काम करताना काय अनुभव आला, यावर वक्तव्य केले आहे. (फोटो सौजन्य: शाहरुख खान इन्स्टाग्राम)
-
रेणुका शहाणे लवकरच ‘देवमाणूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. (फोटो सौजन्य: शाहरुख खान इन्स्टाग्राम)
-
हा मराठी सिनेमा असून यामध्ये त्यांच्याबरोबर महेश मांजरेकर मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो सौजन्य: शाहरुख खान इन्स्टाग्राम)

Pakistan PM Shahbaj Sharif : “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार”; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया!