-
मराठी सिनेविश्वातील ‘वंडगर्ल’ म्हणून वर्षा उसगांवकरांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.
-
वर्षा उसगांवकरांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ मध्ये गोव्यातील कुटुंबात झाला. आज वयाच्या ५७ व्या वर्षी सुद्धा अभिनेत्री एकदम फिट आहेत.
-
वर्षा उसगांवकरांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
-
“मी प्रचंड फुडी आहे. मला चांगलं जेवण आवडतं… पण, मी नेहमी आपलं घरचं पारंपरिक जेवण जेवते. मला मासे खूप आवडतात, भात आवडतो, पुरणपोळी सुद्धा मी खाते. पण, मी या सगळ्या गोष्टी बेतानेच खाते. त्याच्यात मी कधीच बुडून जात नाही.” असं वर्षा उसगांवकरांनी सांगितलं.
-
त्या पुढे म्हणाल्या, “एखाद्या पार्टीत जरी मी गेले आणि तिथे जरी फास्ट फूड असेल, तरी मी त्या पदार्थांकडे कधीच आकर्षित होत नाही. तेवढ्यापुरत्या त्या गोष्टी टेस्ट करते आणि बाजूला होते. कारण, तुम्ही फक्त खाण्यासाठी जगता या गोष्टीला काहीच अर्थ नाही.”
-
“आपलं पोट हे फुग्यासारखं असतं, आपण त्याला जेवढं वाढवू तेवढं ते फुगत जातं. त्यामुळे आवडीचे पदार्थ खाताना कुठे कंट्रोल करायचं, हे आपल्या हातात असतं. त्यामुळे पोट भरून खायचं नाही.” असं वर्षा यांनी सांगितलं.
-
“आयुर्वेदानुसार पोटात जेवल्यावर थोडी जागा हवी. मी सगळ्यांना एवढंच सांगेन की, जसं तुमचं वय वाढत जातं, तसं तुमचं जेवण कमी झालंच पाहिजे.”
-
“काहीही खाताना स्वत:वर निर्बंध ठेवावे लागतात, या गोष्टी मी पाळते आणि याशिवाय बऱ्याच पदार्थांचा मी त्यागही केलेला आहे.” असं अभिनेत्रीने सांगितलं.
-
दरम्यान, वर्षा उसगांवकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्यांनी साकारलेली माई भूमिका प्रचंड गाजली होती. काही दिवसांपूर्वीच त्या ‘शिवा’ मालिकेत झळकल्या होत्या. ( सर्व फोटो सौजन्य : वर्षा उसगांवकर )

पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर