-
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये मंगळवारी, २२ एप्रिलला हदशतवादी हल्ला झाला.
-
‘मिनी स्वित्झर्लंड’ (Mini Switzerland) अशी ओळख असलेल्या दक्षिण काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
-
४० पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केले. येथे जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही.
-
अलीकडील काही वर्षांत नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
-
या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.
-
त्यानंतर पर्यटकांनी आता जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवली आहे.
-
मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहगाममध्ये जाऊन काश्मिरी लोकांची भेट घेतली आहे.
-
तसंच तिथल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटकांनी आवर्जून येथे यावे असे आवाहनही केले आहे.
-
अतुलने सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे.
-
‘चला काश्मीरला जाऊ, सिंधू, झेलमच्या किनाऱ्यावर जाऊ, काश्मिरी लोकांचं म्हणणं ऐकू, काश्मिरी लोकांमध्ये मिसळू, चला काश्मीरला जाऊ. आम्हाला इथेच यायचं आहे, दहशतवादाला हरवायचं आहे’ असा अतुलच्या कवितेचा अर्थ आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अतुल कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच