-
शाहरुख खानच्या कारकिर्दीतील असे चित्रपट ज्यात त्याने दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटांमधील अभिनेत्याच्या दुहेरी भूमिकांनी प्रेक्षकांना प्रभावित केले. एका चित्रपटाने तर कमाईचा विक्रम मोडला. (Photo: Social Media)
-
करण अर्जुन
‘करण अर्जुन’ या चित्रपटात शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेचा पुनर्जन्म होतो. सलमान खानने अभिनेत्याच्या भावाची भूमिका साकारली होती. राखी गुलजारने आईची भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. (Photo: Social Media) -
डुप्लिकेट
शाहरुख खानच्या या चित्रपटाच्या नावावरून तुम्हाला समजले असेलच की यामध्ये अभिनेत्याने दुहेरी भूमिका साकारली आहे. ‘डुप्लिकेट’मध्ये शाहरुख खानने बबलू आणि मन्नूची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सोनाली बेंद्रे आणि जुही चावला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. करण जोहरचे वडील यश जोहर हे या सिनेमाचे निर्माते होते. दरम्यान, हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. (Photo: Social Media) -
पहेली
‘पहेली’ चित्रपटात शाहरुख खानने भूताची आणि एका सामान्य माणसाची भूमिका साकारली होती. चित्रपटाची कथा छान होती मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. राणी मुखर्जीने मुख्य नायिकेची भूमिका केली होती. (Photo: Social Media) -
डॉन आणि डॉन २
शाहरुख खानच्या ‘डॉन’ चित्रपटात त्याने दुहेरी भूमिका साकारली होती. एक गुन्हेगार होता आणि दुसरा एक सामान्य माणूस होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी काम केले आहे. (Photo: Social Media) -
ओम शांती ओम
फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुख खानने ओम कपूर आणि ओमची भूमिका साकारली होती. पुनर्जन्माच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. ज्यामध्ये दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली होती. (Photo: Social Media) -
रा वन
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘रा वन’ चित्रपटात शाहरुख खान एका शेखर सुब्रमण्यम (शास्त्रज्ञ) आणि एका सुपरहिरोच्या भूमिकेत होता. या चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. दरम्यान हा चित्रपट फ्लॉप झाला. (Photo: Social Media) -
फॅन
‘फॅन’ चित्रपटात शाहरुख खानने एका सुपरस्टार आणि चाहत्याची भूमिका साकारली होती. अभिनेत्याला एक वेगळा गेटअप देण्यात आला होता ज्यामध्ये तो त्याच्या वयापेक्षा खूपच तरुण दिसत होता. तथापि, हा चित्रपटही फ्लॉप ठरला. (Photo: Social Media) -
जवान
शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ‘जवान’ ठरला, ज्यामध्ये त्याने आतापर्यंतची सर्वोत्तम दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याने विक्रम राठोड आणि आझाद ही भूमिका साकारली आहे, सिनेमातील वडील आणि मुलगा यांची भूमिका प्रसिद्ध झाली. (Photo: Social Media) हेही पाहा- Photos: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा रंगीबेरंगी साडीमधील मादक अंदाज, फोटो व्हायरल….

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल