-
विनोद खन्ना
बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार आणि त्यांच्या काळातील देखणे अभिनेते विनोद खन्ना यांचा जन्म पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होतो. दरम्यान, १९४७ मध्ये भारताच्या फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. (Photo: Social Media) -
गुलजार
गुलजार यांचा जन्म पंजाबमधील झेलम येथे झाला, जो आता पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. (Photo: Social Media) -
दिलीप कुमार
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे घर पाकिस्तानातील पेशावर येथे होते. त्यांचे खरे नाव युसूफ खान होते. १९३० मध्ये ते त्यांच्या कुटुंबासह मुंबईत आले. (Photo: Social Media) -
देव आनंद
हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार देव आनंद यांचा जन्म गुरुदासपूर येथे झाला. या जागेचं नाव आता पाकिस्तानात नारोवाल जिल्हा आहे. फाळणीपूर्वी ते मुंबईत आले होते आणि इथेच स्थायिक झाले होते. (Photo: Social Media) -
अमरीश पुरी
अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी लाहोर, पाकिस्तान येथे झाला. ते भारतात येऊन स्थायिक झाले. अमरीश पुरी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधून घेतले. (Photo: Social Media) -
सुनील दत्त
दिवंगत अभिनेते आणि राजकारणी सुनील दत्त हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांचा जन्म पाकिस्तानाकडे असलेल्या पंजाबमधील झेलम येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. (Photo: Social Media) -
पृथ्वीराज कपूर
पृथ्वीराज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी भारताला पहिला व्यावसायिक स्टुडिओ, पृथ्वी थिएटर दिला. कपूर घराण्याचे कुलगुरू पृथ्वीराज कपूर १९२८ मध्ये पाकिस्तान सोडून मुंबईत आले. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ रोजी पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला. पेशावरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पृथ्वीराज कपूर त्यांच्या मावशीकडून कर्ज घेऊन मुंबईला पोहोचले होते. (Photo: Social Media) -
राजेश खन्ना
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचे कुटुंब पाकिस्तानचे होते. त्यांचे वडिलोपार्जित घर पेशावरमध्ये होते. त्यांच्या जन्मानंतर ते पाच वर्षांचे होईपर्यंत तिथेच राहिले आहेत. (Photo: Social Media)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल