-
‘कांतारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने इतर बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले.
-
या चित्रपटातील नायक रिषभ शेट्टी याचे सध्या कौतुक होत आहे. त्याचबरोबरीने त्याची अभिनेत्री सप्तमी गौडा चर्चेत आली आहे.
-
‘कांतारा’मध्ये तिने लीला हे पात्र साकारले आहे. रिषभच्या नायिकेच्या भूमिकेत ती दिसली आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
-
सप्तमी मूळची बेंगळुरूची आहे, तिचे वडील सहायक पोलिस आयुक्त आहेत बेंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने सिव्हिल इंजिनीअरिंग केले आहे.
-
सप्तमी गौडाने २०२० मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘पॉपकॉर्न मंकी टायगर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
-
सप्तमीने एका मुलाखतीत सांगितले की कांतारा चित्रपटानंतरदेखील मी साधे जीवन जगत आहे.
-
ती पुढे म्हणाली रिषभ सरांनी माझे फोटो बघून मला चित्रपटाच्या लूक टेस्टसाठी बोलावले होते.
-
चित्रपटात जी भाषा वापरली गेली आहे त्यासाठी सप्तमीने मेहनत घेतली आहे.
-
चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हे दोघे दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात गेले होते.
-
सप्तमी सोशल मीडियावरदेखील सक्रीय आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती पोस्ट शेअर करत असते.
-
सप्तमी उत्तम अभिनेत्री आहे हे तिने दाखवून दिले आहे त्याचबरोबरीने ती एक उत्तम जलतरणपटू आहे.
-
या चित्रपटाच्या यशानंतर तिचे चाहते वाढले असून इंस्टाग्रामवर तिचे follwers वाढले आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य