-
गणेश चतुर्थीचा सण जवळ आला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्याची तयारी आतापासूनच सुरू झालेली असते. स्वच्छतेपासून ते देवाचे कपडे आणि पूजेच्या वस्तूंची खरेदीलाही सुरुवात झाली आहे. पण जर तुम्हाला गणपती बाप्पाला सेवेने प्रसन्न करायचे असेल तर स्वतःच्या हाताने भोग तयार करा.
-
गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत. अशा स्थितीत तुम्हाला हवे असल्यास महाराष्ट्राचे पारंपारिक मोदक गणपतीसाठी बनवून तुम्ही तयार करू शकता.
-
मोदकासाठी साहित्य: पारंपारिक मोदक तयार करायचे असतील तर त्यासाठी दोन वाट्या तांदळाचे पीठ, एक चमचा देशी तूप, एक वाटी किसलेले खोबरे, दोन चमचे गूळ, दोन चमचे बारीक चिरलेले काजू आणि बदाम, वेलची हे साहित्य लागेल.
-
मोदक रेसिपी: मोदक बनवण्यासाठी आधी सारण तयार करून घ्या. यासाठी नारळ घेऊन किसून घ्या. आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात एक चमचा देशी तूप घाला.
-
त्यानंतर त्यात किसलेले खोबरे एकत्र घाला. हलके भाजून झाल्यावर त्यात गूळ घाला. गूळ घालताना त्याचे लहान तुकडे करावेत. जेणेकरून ते सहज वितळतील. नारळात गूळ एकत्र चांगले मिसळा आणि त्यांना मंद आचेवर शिजवा.
-
तसंच त्यात वेलची पावडर किंवा कुटून घाला. नारळावर गुळाचा चांगला लेप झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण एका प्लेटमध्ये पॅनमधून काढा. तुमचे मोदकाचे सारण तयार आहे.
-
आता मोदकाचा बाहेरचा थर तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ घ्या. एका पातेल्यात पाणी टाकून गरम करा. त्यात तूप टाका. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घाला. हे सर्व एकत्र चांगले मिसळा. त्यांनतर थोडा वेळ गॅस कमी करून झाकून ठेवा. तांदळाचे पीठ अर्धे शिजले की ताटात काढा. थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून हे पीठ मळून घ्या.
-
मोदक बनवायचे असल्यास मोल्ड वापरा. किंवा हातावर एक छोटा गोळा घेऊन तो दाबून मधोमध एक जागा तयार करा. नंतर त्यात खोबऱ्याचे सारण भरून चांगले बंद करून मोदकाचा आकार द्या. हे सर्व मोदक मलमलच्या कपड्यात ठेवा. स्टीमर तयार करा आणि त्यात हे मोदक दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्या. तुमचा गणपती बाप्पाचा आवडता मोदक तयार आहे.(सर्व फोटो: संग्रहित फोटो)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख