-
सगळीकडेच आपल्या लाडक्या बाप्पाचं, विघ्नहर्त्या गणरायाचं धूमधडाक्यात आगमन झालं आहे.
-
घरोघरी गणपती बसले आहेतच शिवाय प्रत्येक सार्वजनिक मंडळाचा गणपती आणि त्याच्या भव्यदिव्य अशा मिरावणुकीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
पुण्यातल्या पाचही मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांचे फोटोजही चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यापैकी चौथा मनाचा म्हणजेच तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.
-
या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली होती.
-
तुळशीबागेतल्या अत्यंत वर्दळीच्या जागेत हा मानाचा चौथा गणपती बसतो.
-
हा गणपती आकर्षक आणि भव्यदिव्य अशा मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.
-
प्रथम फायबरच्या मूर्तीची स्थापना करण्याचा मान हा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे आहे.
-
कल्पक देखावे आणि भव्य सजावट यासाठीही हा गणपती लोकप्रिय आहे.
-
त्याच वर्षी अजिंठा-वेरुळ लेण्यांचा भव्य देखावा त्यांनी केला होता. यानंतरच तुळशीबाग गणेशोत्सवाची भव्य देखाव्यांची परंपरा सुरू झाली. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे, पुणे)

Daily horoscope: धनिष्ठा नक्षत्रात कोणत्या राशीचे चमकणार नशीब? कोणाला नोकरीत प्रमोशन तर कोणाला प्रचंड धनलाभाची संधी