-
गणेश चतुर्थीला राज्याबरोबरच देशभरामध्ये गणरायांचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं. पुढील १० दिवस गणरायांचा पाहुणचार अगदी उत्साहात साजरा होणार याची झलक पहिल्याच दिवशी पहायला मिळाली.
-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही गणरायचं आगमन झालं आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.
-
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शनही घेतलं.
-
विशेष म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एका नेत्याच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय.
-
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शनही घेतलं.
-
आमच्या ठाणे येथील निवासस्थानी देखील गणपती बाप्पाचे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदात आगमन झाले, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या घरातील गणपतीचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी सहकुटुंब श्री गणरायाची विधिवत पूजा करून राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याकरिता प्रार्थना केली, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी गणपतीची आरती करताना दिसत आहेत.
-
दुसरीकडे मुंबईमध्ये सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांनाही मोठ्या उत्साहामध्ये गणरायाचं स्वागत केलं.
-
गणरायाचे पूजन करून प्रतिष्ठापना केली असं कॅप्शनमध्ये फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
पत्नी आणि मुलीसोबतचे काही खास फोटो फडणवीस यांनी शेअर केले आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन काल सायंकाळी गणरायाचे दर्शन घेतले. आरती केली, असं सांगत फडणवीस यांनी काही फोटो आज (१ सप्टेंबर २०२२ रोजी) शेअर केले आहेत.
-
यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला आहे.
-
श्रीकांत शिंदे यांनीही फडणवीस यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी श्रीकांत शिंदेंनी कपिल पाटील यांचं स्वागत केल्याचंही ट्विटरवरुन सांगण्यात आलं आहे.
-
सर्व नेते बसून चर्चा करतानाचा फोटोही श्रीकांत शिंदेंनी शेअर केलाय.
-
दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार पियुष गोयल यांच्या घरी गणेश चतुर्थीनिमित्त हजेरी लावले. त्यांनी गणरायाचं दर्शन घेऊन आरतीही केली.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…