-
राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सामान्य नागरिकांसोबतच राजकीय मंडळीही बाप्पा चरणी नतमस्तक होताना दिसत आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं गुरुवारी रात्री दर्शन घेतलं.
-
गणेश मंडपात उपस्थित वारकऱ्यांसह नितीन गडकरींनी रामकृष्ण हरिनामाचा गजर केला. यावेळी मंडळातील वातावरण भक्तीमय झाले होते.
-
दगडूशेठ गणपती मंडळाच्या विश्वस्तांकडून नितीन गडकरींचं हार घालून स्वागत करण्यात आलं. मंदिरात यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
-
१८९३ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी पुण्यात गणेश मूर्तीची स्थापना केली होती. नवसाला पावणारा अशी ख्याती दगडूशेठ हलवाई गणपतीची आहे. दरवर्षी लाखो भाविक या गणपतीच्या दर्शनाला येत असतात.
-
नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी देखील बाप्पांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
-
गणेश मूर्तीच्या स्वागतावेळी बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
-
गडकरी यांच्या निवासस्थानातील देवघरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गडकरी कुटुंबीयांकडून बाप्पांची मनोभावे सेवा केली जात आहे.
-
गणपती बाप्पांची आरती करताना गडकरी कुटुंबीय
-
गडकरी कुटुंबीयांकडून दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
-
करोनानंतर साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवात सध्या राज्यभरात कमालीचा उत्साह आहे.
-
(फोटो सौजन्य-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ट्विटर हँडलवरुन)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य