-
३१ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण खूपच धुमधडाक्यात साजरा केला जातो.
-
दरम्यान, गणपती बाप्पाच्या अवतीभोवती केली जाणारी सजावटही अगदी विचारपूर्वक केली जाते.
-
अशाच प्रकारे, वरळीतील आदर्श नगरच्या इमारत क्रमांक ३९ मध्ये राहणारं बडे कुटुंब दरवर्षी गणपती बाप्पाचा सुरेख देखावा साकारत असतं.
-
यंदाच्या वर्षी बडे कुटुंबानं मोठी उडी घेत थेट शिवसेना भवन साकारलं आहे.
-
हिंदुत्त्वाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही इमारत १९७४ च्या काळात कशी दिसत होती, तेव्हाचं दादर कसं दिसत होतं, याचा देखावा या कुटुंबाने मर्यादित जागेत साकारला आहे.
-
दुसरीकडे त्यांनी कोहिनूर भवनही साकारलं आहे.
-
शिवसेना भवनाच्या आत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कार्यालय या देखाव्यामध्ये दाखवण्यात आली आहे.
-
त्यांच्या समोरून रस्त्यावरून होणारं गणरायाचं आगमन दाखवण्यात आलंय.
-
शक्य तितकी पर्यावरणपूरक सजावट करत या कुटुंबानं हा देखावा साकारला आहे.
-
सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा देखावा बराच बोलका ठरत आहे.
-
गतकाळातील वास्तू साकारणं, तेसुद्धा काही गोष्टींच्या मर्यादेत राहत फारच आव्हानात्मक असतं. पण, वरळीत ते बडे कुटुंबीयांनी साध्य करून दाखवलंय.
-
दरम्यान, हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहेत. (छायाचित्र सौजन्य – आर एन ओ वृत्तसंस्था)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…