-
गिनीज बुक, लिमका बुक रेकॉर्ड प्राप्त कलाकार मोहन कुमार यांनी साबुदाण्यापासून ही गणेशाची रांगोळी साकारली आहे. (फोटो: दीपक जोशी)
-
२५ किलो साबुदाण्यांना तब्ब्ल २५० ते ३०० रंगछटांमध्ये सजवून शिव-पार्वती व गणेशाची सुंदर रांगोळी बनवण्यात आली आहे. (फोटो: दीपक जोशी)
-
पद्मश्री विजेते वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर ३, ४२५ वाळूच्या लाडूतुन गणेशाचे वाळू शिल्प साकारले आहे. (फोटो: ANI)
-
सुदर्शन यांनी साकारलेली गणरायाची वाळूची मूर्ती तब्बल ६ फूट उंच आहे, ज्यात दोन हत्ती साकारलेले आहेत. (फोटो: ANI)
-
भोपाळमधील मूर्तीकार रवी यादव यांनी साबुदाणा व काळीमिरी वापरून ही गणरायाची मूर्ती साकारली आहे. (फोटो: ANI)
-
या मूर्तीमध्ये कोणताही रासायनिक रंग नसून त्यात मोरापंखांची दांड, लाकडाचे चमचे वापरून कलाकुसर केलेली आहे.(फोटो: ANI)
-
श्री स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळ कोपरखैरणे येथे बाप्पाची ही अद्भुत मूर्ती साकारलेली आहे. (फोटो: Narendra vaskar)
-
या मूर्तीसाठी रुद्राक्ष व जपमाळांचा वापर करण्यात आला आहे. (फोटो: Narendra vaskar)
-
मुंबईचा पेशवा मंडळाची ही २२ फूट उंच मूर्ती केळीचा खांब व टिश्यू पेपरच्या लगद्यापासून साकारण्यात आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम/ Mumbaicha_Peshwa)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई