-
कर्करोग हा शब्द ऐकताच बरेच लोक अस्वस्थ होतात. हा रोग केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. (फोटो : Freepik)
-
जोपर्यंत आपण आपल्या डोळ्यांनी कर्क रुग्णाच्या वेदना पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला या रोगाचे गांभीर्य कळत नाही. (फोटो : Freepik)
-
हीच गोष्ट लक्षात घेऊन मुंबईच्या फ्रँकलिन पॉल यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘कर्करोग ग्रस्त रुग्णांची कहाणी’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.
-
रतन टाटा यांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी ‘पॉलचा लाडका’च्या माध्यमातून ‘टाटा कॅन्सर रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर’ याची एक प्रतिकृती तयार केली आहे.
-
यंदाच्या वर्षी त्यांनी गणेशोत्सवाच्या एकोणतीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.
-
आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी हे रुग्णालय पाहिलेलं किंवा त्याबद्दल ऐकलेलं आहे परंतु जी गोष्ट सगळ्यांना अस्वस्थ करते ती म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर असलेले रुग्ण ज्यांना साधनांच्या अभावी रस्त्यावर राहावं लागतं.
-
कर्करोगग्रस्तांसाठी काही तरी करावं या भावनेतून पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदा हा देखावा साकारला आहे. घरगुती गणेशोत्सव घरगुती न राहता त्यातून सामाजिक संदेश कसा करता येईल याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे.
-
पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा देखावा साकार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा अगदी बारकाईने विचार केला आहे.
-
देखाव्यातील या गोष्टी अगदी हुबेहूब वाटतात.
-
हा देखावा साकार करण्यासाठी पॉल यांच्यासह २० जणांनी विशेष मेहनत घेतली.
-
या मेहनतीचे फळ आपण पाहतच आहोत.
-
दरम्यान हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. (फोटो : फ्रँकलिन पॉल)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा