-
Ganeshotsav 2023: श्रीगणेश चतुर्थीचं व्रत हे काही जणांकडे दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, गौरी विसर्जनापर्यंत, अनंत चतुर्दशी पर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते.
-
या गणेशोत्सवाच्या काळात यथाशक्ती गणेशाची उपासना करून उत्सव साजरा करावा.
-
ज्यांना गणपतीची जी स्तोत्रं / श्लोक येत असतील ते म्हणावेत.
-
गणेशोत्सव हा घरातील प्रत्येकाने सहभागी होण्याचा उत्सव आहे त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री-पुरुष सर्वचजण आपापल्यापरीने सहभाग देऊ शकतात.
-
या कालावधीमध्ये घरातील वातावरण चांगले राहील प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी.
-
जेवढे दिवस आपल्या घरी गणेशोत्सव असेल तेवढे दिवस सकाळी व संध्याकाळी पूजा करावी दोन्ही वेळेस पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी पूजा व संध्याकाळी किमान आरती करावी.
-
गोडाधोडाचा स्वयपाक करावा, सात्विक अन्न खावे व आनंदात गणेशोत्सव साजरा करावा.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल