-
सर्वांचाच लाडका गणपती बाप्पा काही दिवसांतच आपल्याला भेटायला येणार आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच 19 सप्टेंबरला गणारायचे आगमन होणार आहे.
-
बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच ठिकाणी लगबग पाहायला मिळतेय. अनेक ठिकाणी सजावटीचे काम सुरू आहे.
-
दहा दिवसाचा हा सोहळा सगळेच अगदी जल्लोषात साजरा करतात. यावेळी कोकणातील घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.
-
मात्र, बाप्पाच्या आगमनानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.
-
अनेक गणेशभक्त मनोभावे स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती तयार करतात. मात्र, गणेशमूर्ती बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
-
गणेशमूर्ती तयार करताना बाप्पाच्या डोक्यावर मुकुट असेल यांची खात्री करून घ्या. बाप्पाचे मुकुट चांगले नशिबाचे प्रतीक मानले जाते.
-
तुम्ही तुमची गणेशमूर्ती बाजारातून विकत घेत असाल किंवा घरी बनवत असाल तरी गणपती बसलेल्या स्थितीत असावा याची खात्री करा. तसेच, गणेशमूर्तीमध्ये त्याचा साथीदार उंदीर आणि काही ‘मोदक’ देखील असतील याची खात्री करून घ्यावी कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते असे म्हटले जाते.
-
बाप्पाचे घरी स्वागत करताना तुमच्या गणेशमूर्तीला लाल कापडाने झाकावे.
-
गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर-पूर्व या शुभ दिशा मानल्या गेल्या आहेत.
-
गणपती बाप्पाचे स्वागत शंख, घंटानाद आणि सणाच्या उत्साहाने व्हावे.
-
गणपतीची उजवीकडे असलेली सोंड त्याच्या हट्टी वृत्तीचे प्रतिनिधित्व करते किंवा कठीण काळ दर्शवते. म्हणूनच बाप्पाच्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली असावी. ही सोंड यश आणि सकारात्मकता दर्शवते.
-
गणेशमूर्ती दुर्लक्षित नसावी. मूर्तीसह सतत कोणीतरी राहावे.
-
घरामध्ये बाप्पाचे वास्तव्य असल्यास केवळ सात्विक अन्न शिजवावे आणि याचाच बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
-
मूर्तीची पूजा आणि आरती केल्याशिवाय तिचे विसर्जन करू नये.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : pexels)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…