-
Lalbaugcha Raja 2023 First Look : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
-
अवघ्या तीन दिवसांनी प्रत्येक घराघरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.
-
सध्या अनेक ठिकाणी गणपतीच्या आगमनापूर्वीची लगबग पाहायला मिळत आहे.
-
अवघ्या मुंबईकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ‘लालबागचा राजा’ची पहिली झलक समोर आली आहे.
-
लालबागचा राजाचे यंदा हे ९० वे वर्ष आहे.
-
यंदा ‘लालबागचा राजा’साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे.
-
मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे.
-
यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात.
-
राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करताना दिसतात.
-
‘लालबागच्या राजा’च्या मंडळाची स्थापना सन १९३४ मध्ये करण्यात आली होती. (सर्व फोटो – लालबाग राजा/युट्यूब)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…