-
गणांचा अधिपती म्हणजेच गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते.
-
गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते.
-
आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
-
त्यामुळे अनेकांच्या घरी सजावटीची लगबग पाहायला मिळत आहे.
-
गणरायाची पुजा करताना आपण २१ दुर्वांची जुडी, जास्वंद आणि २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो.
-
पण, गणपतीची पुजा करताना २१ दुर्वांची जुडी, २१ मोदकांचा प्रसाद, जास्वंद किंवा तांबडी फुलंच का वाहिली जातात? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
-
आता आपण त्यामागचे कारण जाणून घेणार आहोत.
-
पंचांगकर्ते श्री. मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुलं, पत्री वाहण्याची प्रथा आहे.
-
जसे विठोबाला तुळस, शंकराला बेल, गणपतीला दूर्वा आणि जास्वंदाची फुले आवडण्याबाबत अनेक कथा आहेत.
-
यासर्वच देवतांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ते तत्व आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावं यासाठी आपण त्यांचं पूजन करतो, उत्सव साजरे करतो.
-
दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते.त्यामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
-
या दुर्वा शक्यतो कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहाव्यात.
-
दुर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या.
-
गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे महत्त्वाचे मानले जाते.
-
याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण शेंदरी / लाल आहे.
-
पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते.
-
गणपतीला दुर्वा आणि लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जात. त्यामुळे अशा फुलांना प्राधान्य द्यावे.
-
येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र याची लगबग पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो-pexels)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?