-
गणांचा अधिपती म्हणजेच गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. (फोटो – अनस्पॅल्श)
-
सध्या सर्वत्र गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. (फोटो – अनस्पॅल्श)
-
घरोघरी विराजमान होणाऱ्या लाडक्या बाप्पांचा पाहुणचार करण्यासाठी विविध पक्वान्नांची तयारीही सुरु आहे. (फोटो – अनस्पॅल्श)
-
गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंद यापेक्षाही सर्वात जास्त प्रिय असलेला पदार्थ म्हणजे मोदक.
-
मोदक म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम मोदकावर साजूक तूप टाकून खाण्याची मज्जाच काही औरच… (फोटो – अनस्पॅल्श)
-
आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. (फोटो – अनस्पॅल्श)
-
त्यामुळे गणपतीला ‘मोदकप्रिय’ या नावानेही ओळखले जाते.
-
पण गणपतीला मोदक आवडण्यामागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.
-
गणपतीला मोदक आवडण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते.
-
एकदा भगवान शिव झोपले होते आणि श्री गणेश दरवाज्यावर पहारा देत होते.
-
जेव्हा परशुराम तिथे पोहोचले, तेव्हा गणपतीनं त्याला दारात थांबवले.
-
परशुराम हे रागावून गणपतीशी भांडू लागले. या युद्धात परशुरामाने गणेशावर हल्ला केला. ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला.
-
दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले. (फोटो – अनस्पॅल्श)
-
मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले.
-
तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे.
-
मोद म्हणजे आनंद. गणपती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःखही दूर करतात.
-
त्यांच्या जीवनात आनंद आणतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात.
-
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला प्रसन्न करण्यासाठी २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
-
मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होते, मन आनंदी होते.
-
त्यामुळे गणपतीला मोदक प्रचंड आवडतात. (इतर फोटो-pexels)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन