-
आपल्या लाडक्या बाप्पाचे अतिशय वाजत गाजत आगमन झाले आहे. (Photos: Pexels)
-
बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडेच अतिशय प्रसन्न वातावरण आहे. (Photos: Pexels)
-
अनेक ठिकाणी बाप्पासाठी अतिशय सुंदर सजावट केली जाते. मुंबईत तर भलेमोठे देखावे उभारले जातात. (Photos: Pexels)
-
बरेचदा या देखाव्यातून एखादा संदेश देण्याचाही प्रयत्न केला जातो. (Photos: Pexels)
-
मुंबईतील प्रसिद्ध पराग सावंत या कलाकाराने गणपती बाप्पासाठी यंदा अनोखा देखावा साकार केला आहे.
-
फेसबुकवर त्याने एक सुंदर पोस्ट लिहून यासंबंधीचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्याने लिहिलंय, “प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी खिडकी असते, जिथे तो मनमोकळेपणाने जगतो आणि रमतो.”
-
“मग ती खिडकी शाळेतील असो वा ऑफिसमधील…”
-
“चाळीतील असो…”
-
“वा इमारतीमधील…”
-
“आनंदाची असो…”
-
“वा दुःखाची…”
-
“प्रेमाची असो…”
-
“वा सहवासाची…”
-
“अश्या अनेक खिडक्यांच्या वेढ्यात आपण जगत असतो, काही खिडक्या आपल्याला जगायच्या असतात तर काही खिडक्या जगू वाटतात किंवा काही खिडक्या आपल्या नसल्या तरी दुसऱ्यांच्या आयुष्यातून ते क्षण आपण खिडक्यांच्या नजरेतून जगू पाहतो…”
-
“याच आयुष्यात आलेल्या आणि पुढेही कायम सोबत असणाऱ्या खिडक्याचा प्रवास आम्ही गणरायाच्या सहवासाने दाखवू पाहतोय…”
-
फोटो : पराग सावंत यांच्या फेसबुक अकाऊंटवरून साभार
![sant Tukaram maharaj suicide news in marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/cats_5f1be7.jpg?w=300&h=200&crop=1)
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी