-
अलिबाग शहराजवळ हाकेच्या अंतरावर असलेला समुद्रातील जलदुर्ग म्हणजे किल्ले कुलाबा. १६८० नंतर किल्ल्याची बांधणी करण्यात आली.
-
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा साक्षिदार असलेला हा किल्ला आजही भक्कम अवस्थेत असून भरती -ओहोटीच्या वेळा बघत या किल्ल्याला सहज भेट देता येते.
-
कुलाबा किल्ल्यावर गणेशपंचायत आहे. मध्यभागी उजव्या सोंडेचा गणेश आणि सभोवताली देवी, सूर्यनारायण, शंकर आणि विष्णू यांच्या मूर्ती आहेत.
-
सातारा जिल्ह्यातील पाटणपासून ७ कि.मी.वर असलेल्या टोळेवाडी गावाजवळ अर्ध्या तासात चढाई करता येईल असा हा दातेगड किल्ला आहे. याला सुंदरगड या नावानेही ओळखले जाते.
-
हा किल्ला साधारण तलवारीचा आकार असलेल्या खोल अशा विहिरीसाठी आणि कातळात कोरलेल्या गणेश-हनुमानाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.
-
साधारण सहा फुट उंचीची दगडात कोरलेली गणेश मूर्ती अत्यंत आकर्षक असून हातात परशू, अंकुश अशी शस्त्रे असून कान हे जास्वंदाच्या फुलासारखे आहे, पोटावर नागाचे वेटोळे आहे.
-
भीमाशंकर जंगलाच्या एका बाजूला किंवा राजगुरुनगर मार्गाने भोरगिरी किल्ल्याकडे जाता येते.
-
भोरगिरी गावातून सहज अर्ध्या-पाउण तासात चढाई करता येईल असा हा किल्ला निसर्गरम्य परिसरात आहे. इतिहासातील झंझ राजापासून या परिसराला इतिहास आहे.
-
या किल्ल्लाच्या पायथ्याशी गावात असलेल्या कोटेश्वर महादेवाच्या मंदिरात वैशिष्ट्यपूर्ण अशी गणरायाची मूर्ती आहे. ही मूर्ती आधी किल्ल्यावर असावी आणि नंतर कालांतराने मंदिरात विराजमान झाली असावी.
-
१३ व्या शतकापासून उल्लेख असलेला बागलाण भागातील प्रसिद्ध किल्ला मुल्हेर. तलवारीची प्रसिद्ध मुल्हेरी मूठ याच भागातील शासक बागुल राजे यांच्या काळात प्रत्यक्षात आली.
-
मुख्य मुल्हेर किल्ला आणि बालेकिल्ला अशी डोंगराच्या दोन भागात किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती. आजही या किल्ल्यावर अनेक वास्तू, मंदिर, तोफा आणि भग्नावशेष यांची रेलचेल आहे.
-
मुल्हेर माचीवरील तलावाला खेटून उभे असलेले गणेश मंदिर अप्रतिम. मंदिरात शिलालेख, विविध शिल्पाकृती आहेत. गाभाऱ्यात शंकर आणि समोर भिंतीत गणेश विराजमान झालेला आहे.
-
छत्रपती शिवाजी महारजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेला राजगड किल्ला आजही भक्कम असून संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघण्याची दोन दिवस सहज लागतात.
-
सुवेळा माची आणि तिची बांधणी तर अप्रतिमच. या माचीवरुन सूर्यादय बघत किल्ल्याचे, सह्याद्रीचे रुप डोळ्यात टिपत रहाणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
-
या माचीच्या एका बाजूला भिंतीत गणेशाची अप्रतिम मूर्ती विराजमान आहे. सुवेळा माचीच्या बांधकामाच्या वेळी शिवरायांनी पुजा केलेला गणेश अशीही त्याची ओळख आहे.
-
कणकवली-आचरा मार्गावर रामगड गावापासून हाकेच्या अंतरावर रामगड किल्ला आहे. गड नदीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी महाराजांनी किल्ल्याची निर्मिती केली.
-
किल्ल्याचे बुरुज, तटबंदी, प्रवेशद्वार अजुनही तग धरुन आहेत. किल्ल्यांत तोफा आणि भग्नाशेष मोठ्या प्रमाणात आहेत. तर सात तोफा उलट्या जमिनीत उभ्या करुन ठेवलेल्या बघायला मिळतात.
-
किल्ल्यात काळ्या पाषणात एक फुट उंचीची अत्यंत सुबक आणि आगळीवेगळी अशी गणेश मूर्ती बघायला मिळते.
-
राज्यात गिर्यारोहकांची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगड. या किल्ल्याची चढाई केल्याशिवाय सह्याद्रीतील भटकंती पुर्ण होऊच शकत नाही.
-
अविश्वनीय, निसर्गाचा चमत्कार असा कोकणकडा, केदारेश्वर गुहेतील पाण्यातले शिवलिंग, तारामती शिखर आणि हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर अशी अनेक ठिकाणे प्रेक्षणिय आहेत.
-
तारामती शिखराच्या पायथ्याशी आठ लेण्यांचा समूह आहे. यापैकी एका लेणीत सुमारे दोन मीटर उंचीची गणेश मूर्ती आहे. ( सर्व छायाचित्र – अमित जोशी )

Goa: “परत कधीच गोव्याला येणार नाही”, पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केला गोव्यातील भयावह अनुभव