-
गणेश चतुर्थी हा सण प्रत्येकाच्याच आवडीचा. मग यात आपले लाडके सेलिब्रिटी कसे मागे राहतील?
-
अभिनेता भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यांच्या घरच्या बाप्पाची मूर्ती आणि त्यांनी केलेली सजावट नेहमीच लक्ष वेधून घेत असते.
-
भूषण आणि त्याच्या आईचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल असल्याने ते दरवर्षी स्वतःच्या हाताने घरातच बाप्पाची मूर्ती तयार करतात.
-
भूषणच्या आई शाडूच्या मातीपासून स्वतः गणपती तयार करतात. भूषणही त्यांना शूटिंगमधून वेळ मिळेल तशी मदत करत असतो.
-
एका मुलाखतीत भूषणने आपल्या घरचा बाप्पा आणि गणेशोत्सवाच्या तयारीबाबत भाष्य केले आहे. त्याच्यासाठी हा बाप्पा खूप जवळचा आहे.
-
भूषणने मुंबईत घर घेतल्यापासून म्हणजेच गेल्या आठ वर्षांपासून तो दीड दिवसाचा गणपती आणतो.
-
गणपतीची मूर्ती रंगावण्याचं काम भूषणकडे असतं. याशिवाय बाप्पासाठी करण्यात येणारी सजावटही पर्यावरणपूरक असते.
-
यंदाही भूषणच्या बाप्पासाठी पांढऱ्या फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.
-
दीड दिवसाच्या या बाप्पाचे विसर्जनही घरीच केले जाते. घराच्या बाहेरील पॅसेजमध्ये अतिशय पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन केले जाते.
-
सर्व फोटो : भूषण प्रधान/इन्स्टाग्राम

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही