-
भारतीय समाज उत्सवप्रिय आहे, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आपण आपली विविध सणवारांनी भरलेली संस्कृती जपत आलो आहोत. गणेशोत्सव त्यात विशेषच!
-
जपान येथे योकोहामा मंडळ मागील आठ वर्षापासून गणेशोत्सवाची परंपरा साजरी करत आहे. योकोहामा मंडळाचा गणेशोत्सव सोहळा जणू तेथील सर्व भारतीयांचे चैतन्याचे केंद्र बनले आहे.
-
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मंडळाने आपली वेगळी छाप सोडत हा सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला.
-
फुला-पानांनी सजवलेल्या आणि मंडळातील सदस्यांनी स्वतः सुतारकाम करून बनवलेल्या पालखीतून बुध्छिदाता गजाननाची मनमोहक प्रतिमा ढोल, ताशा आणी लेझिम यांच्या गजरात वाजतगाजत आणण्यात आली.
-
भगवा झेंडे, टाळ घेतलेले बाल वारकरी, लेझिम घेतलेले बालपथक आणि पाठोपाठ नऊवारी साडी नेसलेल्या महिलांचा समूह, सदरा आणि फेटे घातलेले मंडळाचे कार्यकर्ते यांनी ही मिरवणूक आणखीनच रंगतदार बनवली.
-
ही मिरवणूक पाहून कित्येक जपानी नागरिकांनी न राहवून या मिरवणुकीत ढोल ताश्याच्या तलवार ठेका धरला.
-
ढोल-ताशा, लेझिम, गणपती बाप्पा मोरयाच्या जोरदार घोषणा त्यावर एकाच ठेक्यावर चालणारी लहान मोठी पावले, असं भक्तियुक्त वातावरण ‘पहावे हा क्षण आणि ठेवावा कायम मनी’ असा होता.
-
जपानमधील आवश्यक असलेल्या सर्व परवानगी काढून अतिशय शिस्तबद्धतेने कोणालाही त्रास न देता हा उत्सव पार पाडला.
-
यावर्षी योकोहामा मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून अक्षय्य ऊर्जा (renewable energy) ही संकल्पना मांडली. यावेळी सौर ऊर्जा (solar energy), पवन उर्जा (wind energy), जलविद्युत ऊर्जा ( hydro power) याचबरोबर वीजप्रवाह ( electricity transmission) कसा होतो हे सर्व देखावे अगदी उत्तमपणे मांडण्यात आले.
-
अक्षय्य ऊर्जा हीच संकल्पना मनात ठेवून बाल भक्तांसाठी विविध कार्यक्रम राबवण्यात आले. अक्षय्य ऊर्जा वर सादरीकरण, चित्रकला, हस्तकला व स्वसंकल्पना आधारित प्रतिभा असे विशेष कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-
गणरायाची अतिशय सुंदर प्रतिमा ही थेट घाटकोपर येथील विलास आर्टस् यांच्याकडून मागवण्यात आली होती.
-
गणरायाची अतिशय सुंदर प्रतिमा ही थेट घाटकोपर येथील विलास आर्टस् यांच्याकडून मागवण्यात आली होती.
-
आपल्या भारतीय उत्सवांचा आनंद लुटण्यासाठी जपानमधील अनेक भारतीय भाविक अगदी शेकडो किलोमीटर दुरून योकोहामा येथे बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते.
-
दुसऱ्या दिवशी सकाळी विविध कार्यक्रमांनी दिवसाची सुरुवात करत बालमनांसाठी अथर्वशीर्ष, पुराणातील कथा आणी भजने सादर करण्यात आली. तसेच, विरत भोजन सेवा सुरू होती.
-
दुपारी ३५०-४५० भक्तांसाठी भंडारा करण्यात आला. येथेही आपली परंपरा सातासमुद्रापार दिसावी यासाठी भक्तांच्या पंगती बसवण्यात आल्या.
-
त्यात खास भारतातून मागवलेल्या पत्रवळीचा वापर करण्यात आला. याद्वारे मंडळाने परदेशातही पर्यावरण सुरक्षेचा एक छान संदेश दिला.
-
बाप्पांना निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा आणि ढोलताशाच्या धुमधडाक्यात विसर्जन मिरवणूक निघाली.
-
या दोन दिवसाच्या सोहळ्यात वर्षभराचा आनंद मनात साठवून सर्व भक्तगण भावुक नजरेने आपल्या लाडक्या विघ्नहर्ता गणरायाला निरोप देत होते.
-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत होते.
-
योकोहामा मंडळ जपानमधील सर्वात मोठा आणि आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करते. गणेशोत्सवाचा सोहळा मर्यादित कालावधीसाठी असला तरी मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि इतर सामाजिक कार्याचा कालावधी वर्षभर चालतो.
-
परदेशात राहून मायदेशी असल्याची भावना सर्व जपान निवासी भारतीयांना देणे हेच या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी वर्षभर समाजप्रबोधन व्हावे म्हणून मंडळ दसरा, नवरात्री, नवीन वर्षारंभ, मकरसंक्रांत चा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, मंगळागौर असे अनेक उत्सवी उपक्रम राबवते.
-
नुकत्याच जपान दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाच्या या सर्व कार्यांचे विशेष कौतुक केले. (सर्व फोटो : योकोहामा मंडळ)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही