-
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
-
बाप्पाच्या जंग्गी स्वागतासाठी आता घरोघरी आणि मंडळांमध्ये मखर,मंडप बांधण्यापासून सजावटीची तयारी सुरु झाली आहे.
-
गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
-
मुंबईतही बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत, लालबाग-परळसह अनेक याठिकाणी तर काही गणेश मंडळाचे बाप्पा मंडपात आलेही.
-
तर अनेकांची आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग सुरु आहे.
-
दरम्यान दरवर्षी मुंबईतील मूर्तीकारांनी घडवलेल्या गणेश मूर्तींना देशभरातून मोठी मागणी असते.
-
यंदाही अनेक सुंदर गणेशमूर्ती देशभरातून मागणी असून या मूर्ती ट्रेनने देशातील कानाकोपऱ्यात रवाना होत आहेत.
-
दरम्यान रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन ट्रेनमे सूरतच्या दिशेने सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती रवाना झाल्या.
-
याशिवाय मुंबईहून अशाप्रकारे ट्रेनने अनेक भागात मोठ्या गणेश मूर्ती रवाना होत आहेत.
-
यात मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींप्रमाणे घरगुती गणेश मुर्तींचाही समावेश आहे.
-
रेल्वे स्टेशनवरील गर्दीतून वाट काढत अगदी सावकाशपणे अनेक लोक या गणेश मूर्तींना ट्रेनमध्ये उचवून ठेवत आहेत.
-
अशाप्रकारे केवळ मुंबईतच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात आता लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी भक्त आतूर झाले आहेत. (सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, पवन खेंग्रे, शंखदीप- इंडियन एक्सप्रेस)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स